आजचे राशिभविष्य शुक्रवार,३ नोव्हेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
अश्विन कृष्ण षष्ठी. शरद ऋतू, दक्षिणायन, शोभन नाम संवत्सर.
“आज उत्तम दिवस”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसु.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल ग्रहमानाचा आनंद घ्या. प्रतिष्ठा वाढेल. उत्तम आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास घडतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आत्मविश्वास आणि उत्साह यांचा अनुभव येईल. येणाऱ्या काळासाठी तुम्ही तयार असणार आहे.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसा चांगला दिवस नाही. तरीही अनेक सुखद घटना घडतील. काळजी पूर्वक काम केल्यास आनंद मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अजून एक आनंद देणारा अनुकूल दिवस आहे. मंगळ, बुध, शुक्र, हर्षल यांशी चंद्राचा शुभ योग आहे. नवीन खरेदी होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामाचा वेग वाढेल. नवीन भरघोस व्यवसाय येणार आहे. त्यासाठी तयार राहा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जुने मित्र भेटतील. नात्यातून लाभ होतील. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. पर्यटन घडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रतिकूल दिवस आहे. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. सरकारी कामात चालढकल नको. काळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) हरवलेली वस्तू सापडेल. सौख्य लाभेल. ज्याची वाट बघत होतात, ती घटना घडेल. शांतता लाभेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसाय आणि नाते बळकट करणारा दिवस आहे. जुन्या मित्रांकडून लाभ होतील. राजकीय यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शेअर्समधून उत्तम यश लाभेल. जुनी गुंतवणूक कामास येईल. संततीकडून खुश खबर मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवीन खरेदीचे योग् आहेत. राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. स्थलांतर घडेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.