ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन कृष्ण द्वितीया. शरद ऋतू.
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/वृषभ.
“आज कृतिका वर्ज्य दिवस”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या घटना घडतील. सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. कलाकारांना यश लाभेल.
वृषभ:- सुरुवात संथ होणार आहे. लवकरच कामास गती प्राप्त होईल. नोकरीत काही विलक्षण बदल घडतील.
मिथुन:- सकाळची सुरुवात चांगली होणार आहे. कामे पूर्ण करा. नंतर मात्र नियोजन बदलेल.
कर्क:- संथ सुरुवात झाली तरीही नंतर कामाचा वेग वाढेल. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.
सिंह:- नोकरी/व्यवसायात बदल संभवतात. अधिकाराची वाटणी होईल. जागा बदलेल.
कन्या:- संथपणे सुरुवात होईल. आळस वाढेल. मात्र नंतर वेग वाढेल. आरोग्य सांभाळावे लागेल.
तुळ:- सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करून घ्या. नंतर नियोजन बिघडेल. शेअर्स मधून नुकसान संभवते.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. कामाचा आनंद घ्याल. उत्साह वाढेल. गती प्राप्त होईल.
धनु:- तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील. सुरुवात चांगली होईल. अंदाज अचूक येतील.
मकर:- कौटुंबिक वाद सुटतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. जामीन राहू नका.
कुंभ:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. सकारात्मक अनुभव येतील. उत्तरार्ध विश्रांतीचा.
मीन:- अनुकूल दिवस आहे. नवीन अनुभव येतील. चंद्र -शनी केंद्रयोग तुम्हला अंतर्मुख करेल. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
