ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. वसंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज उत्तम दिवस आहे”
नक्षत्र: आश्लेषा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क. (धृती योग शांती करून घेणे)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी त्रिकोण चंद्र आणि चंद्र लाभ गुरू हे शुभ योग आहेत. शुक्र युती शनी आहे. बरेच ग्रह व्यय स्थानात आहेत. साडेसाती चालू झालेली आहे. योग्य सल्ला घेतल्यास आणि काळजी पूर्वक पावले टाकल्यास प्रगती साध्य होईल. कार्तिक आवक आणि खर्च आज सारखेच राहतील. प्रलोभने टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) ग्रहमान सर्वार्थाने प्रसन्न आहे. एकाचवेळी भौतिक सुखे आणि आध्यत्मिक प्रगती साध्य करणारा दिवस आहे. येणी वसूल होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनाची उभारी धरल्यास आज रखडलेली कामे पूर्ण होतील. आळस झटकून कमला लागावे लागेल. महिलांकडून लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्रआहे. व्यवसायात वाढ होईल. अनुकूल गुरू भरघोस मदत करेन. नवनवीन पदार्थ चाखण्याचा दिवस आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यय स्थानी चंद्र आहे. आणि अष्टम स्थानी बरेचसे ग्रह बसलेले हेत. जपून पावले टाका.विचारपूर्वक निर्णय घ्या. एखादे काम न जमल्यास तसे स्पष्ट सांगा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अकराव्या स्थानी चंद्र आहे. तुमचा चटपटीत स्वभाव आज कामास येईन. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. शनीचे पाठबळ लाभेल. मन अनादी राहील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरीच्या ठिकाणी विशेष उत्साह जाणवेल. कामाची गती वाढेल. शनी महाराज आर्थिक बाबतीत तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नव्या तंत्रज्ञानाला सामोरे जावे लागेल. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. पत्नीचा सल्ला मोलचा ठरेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. अकस्मात धनलाभ होईल. आश्चर्यकारक घटना घडतील. खर्च देखील वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सप्तम स्थानी चंद्र आहे. जोडीदाराची विशेष काळजी घ्याल. मनास संतोष लाभेल. ऐश्वर्य अनुभवाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या सहाव्या घरात चंद्र आहे. धनलाभ करून देणारे ग्रहमान आहे. मूल्यवान खरेदी कराल. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मानसिक पातळीवर काहीसा अस्वस्थ करणारा दिवस आहे. मात्र तुमचा आत्मविश्वास दांडगा आहे. या जोरावर तुम्ही यशस्वी वाटचाल कराल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
