ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल पौर्णिमा. शरद ऋतू, दक्षिणायन.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज ग्रहण दिवस आहे” *कोजागिरी पौर्णिमा, खंडग्रास चंद्रग्रहण* जेष्ठ अपत्यास ओवाळणे. नवन्न प्राशन.
नक्षत्र: अश्विनी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) काहीसा सुखद अनुभव येईल. मात्र महत्वाची कामे आज नकोत. सुरुवात संथ होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अनुकूलता नाही. विजेपासून काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. व्यवसाय वाढेल. अर्थ पूर्ती होईल. आनंदी राहाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात लक्ष लागणार नाही. दिवस संथपणे व्यतीत होईल. नियोजन बदलेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामानिमित्त भ्रमंती घडेल. विनाकारण धावपळ वाढेल. चिंता निर्माण होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज नवीन सुरुवात नको. नेहमीची कामे चालू ठेवा. संध्याकाळ आनंदाची.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पत्नीसोबत वेळ व्यतीत कराल. काही नवीन नियोजन कराल. लवकरच खुश खबर मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कामाचे नियोजन बदलावे लागेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काहीतरी नवीन करावे असे वाटेल. मात्र संयम आवश्यक आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शांतपणे काम सुरू ठेवावे. संध्याकाळ मेजवानीची आहे. वाहनापासून काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) धावपळ वाढणार आहे. कामाचे योग्य नियोजन करा. खर्चात वाढ संभवते. मात्र आवक देखील वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मन: शांती दूर करणारा दिवस आहे. संयम बाळगा. ध्यानधारणा करा. घाई नको.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)