आजचे राशिभविष्य शनिवार,७ ऑक्टोबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ -सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
भाद्रपद कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू, दक्षिणायन.
“आज चांगला दिवस आहे” *अविधवा नवमी, नवमी श्राद्ध*
नक्षत्र: पुनर्वसु.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मिथुन/कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक लाभ होतील. मात्र सरकारी कामात दिरंगाई नको. काळजी पूर्वक वाटचाल करा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अति धाडस नको. आर्थिक नियोजन काळजी पूर्वक करा. संयम ठेवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) काही चांगले अनुभव येतील. अभ्यासात लक्ष द्या. गैरसमज टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अजूनही अनुकूलता नाही. नेहमीची कामे चालू ठेवा. नवीन काही सुरू करू नका.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नवीन मुहूर्तमेढ कराल. योग्य सल्ला घ्या.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सावधपणे वाटचाल करा. आरोग्य सांभाळा. काही सुखद अनुभव येतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल कालावधी आहे. जुनी येणी वसूल होतील. प्रवास घडतील. मात्र गैरसमज टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संथपणे दिवस व्यतीत होईल. नियोजन बदलेल. संध्याकाळ आनंदाची.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पूर्वार्धात कामे पूर्ण करा. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. संध्याकाळ विश्रांतीची.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सिद्धांत सोडू नका. चुकीची कामे नकोत. प्रशासकीय कामात लक्ष घालावे लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक घडी बसेल. संध्याकाळ अनुकूल आहे. मात्र संततीची काळजी वाटेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूलता वाढेल. कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.