आजचे राशिभविष्य रविवार,२२ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिकc

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल अष्टमी. शरद ऋतू.दक्षिणायन.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे” *अष्टमी उपवास, दुर्गष्टमी*
चंद्र नक्षत्र – उत्तरा आषाढा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

आजचा रंग – जांभळा 

Pallavi Vaidya
पल्लवी वैद्य (अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)   

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) काही चांगल्या घटना घडतील. येणीवसूल होतील. मात्र शत्रू प्रबळ होतो आहे. काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक स्थिती भक्कम राहील. मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. प्रवासात त्रास.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक आरोग्य जपावे लागेल. मुश्किल कालावधी आहे. संयम ठेवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरगुती कामात वेळ जाईल. पत्नीशी मतभेद टाळा. कुटुंबाला समजून घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कार्तिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. चांगल्या संधी चालून येतील. भौतीक सुखे लाभतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अचानक लाभाचे योग आहेत. खर्चात वाढ होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कसोटीचा काळ आहे. तुमच्या राशीत रवी, मंगळ, बुध, केतू आहेत. संयम ठेवा. काळजीपूर्वक निर्णय घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यय स्थानातील ग्रहांच्या गर्दीमुळे संभ्रम निर्माण होईल. घाईने निर्णय घेऊ नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम ग्रहमान आहे. राजकीय खेळी यशस्वी होतील. आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामाच्या ठिकाणी नवनवीन अनुभव येतील. स्पर्धा जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  सप्तमात शुक्र गुरुषी शुभ योग करत आहे. सिद्ध हस्त लेखन होईल. मोठे करार घडतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज नकोत. संयम आवश्यक आहे.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.