आजचे राशिभविष्य गुरूवार,२ नोव्हेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन कृष्ण पंचमी. शरद ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ -दुपारी १.३० ते दुपारी ३.००“आज उत्तम दिवस” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत उत्तम दिवस आहे.आर्थिक बाजू बळकट होईल.नात्यातून लाभ होतील.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंबक सौख्याच्या दृष्टीने उत्तम कालावधी आहे.स्थावर संपत्ती वाढेल. मोठे करार होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढवणारा कालावधी आहे. मन प्रसन्न राहील. नवीन खरेदी होईल.मौल्यवान घटना घडतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. खर्च वाढणार आहे. मात्र तरीही आनंदी राहाल. मोलाचे क्षण अनुभवाल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अतिशय आनंदाचा दिवस आहे. प्रगती होईल. शुभ ग्रहमानाचा आनंद घ्याल. यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नोकरीत मनासारख्या घटना घडतील. आर्थिक आवक वाढेल. व्यवसायात यश लाभेल. स्वप्ने साकार होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) साक्षात लक्ष्मी प्रसन्न करणारा कालावधी आहे. हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आनंदी आनंद अनुभवाल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. प्रवास घडतील. संयम ठेवावा लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सहल घडेल. आनंद मिळेल. तीर्थाटन होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक यश मिळेल. उत्सवाचा आनंद घ्याल. प्रसन्न वाटेल. कनिष्ठ कर्मचारी सहकार्य करतील..

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पेच सुटतील. गूढ उलगडतील. नवीन माहिती मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पशु लाभ होतील. समाजात नाव उंच होईल. मान सन्मान मिळतील. समाज कार्य कराल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!