आजचे राशिभविष्य मंगळवार,१० ऑक्टोबर २०२३
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक काय आहेत १० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण एकादशी. वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस” *इंदिरा एकादशी*
नक्षत्र – मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. पंचमातील चंद्र शुक्र युती प्रेममय कालावधी देत आहे. शेअर्समध्ये लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वाहन सुख लाभेल. नवीन खरेदी होईल. नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक वाढेल. नात्यातून लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धन स्थानात चंद्र शुक्र युती आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. धन धान्य विपुल मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. नेतृत्व गुण उदयास येईल. पत्नीशी मतभेद संभवतात.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होऊ शकते. माळीण वस्तूची दुरुस्ती करावी लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अतिशय उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. वेळ दवडू नका. संततीची काळजी वाटेल.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. नोकरीत मनासारखी कामे होतील. गृहकलह टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) लक्ष्मी प्रसन्न होईल. अध्यात्म आणि भौतिक सुख यात मन दोलायमान होईल. योग्य निर्णय घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. प्रलोभने समोर येतील. सारासार विचार करा. संयम आवश्यक आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रणयरम्य दिवस आहे. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. मात्र चुकीचे काम केल्यास दूरगामी परिणाम भोगावे लागतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) काही चांगले निर्णय होतील. आर्थिक आवक वाढेल. आश्रय. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
काय आहेत १० ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:
तुमच्यावर रवी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जीवनात उच्च तेच निवडतात. फार सखोल अभ्यास न करता देखील तुम्ही इतरांवर प्रभाव पाडू शकतात. आई-वडील पत्नी इतर नातेवाईक यांच्यापासून तुम्हाला लाभ होतात. तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे. तुमचा स्वभाव धडपडा आहे. तुमच्या वृत्ती स्वतंत्र असून तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. सतत बदल करण्याकडे तुमचा ओढा असतो. आपला आयुष्यात काहीतरी सणसणाटी असावे असे तुम्हाला नेहमी वाटते.
तुमच्या आयुष्यात बरेच चढउतार होतात. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. तुम्हाला कला आणि प्रवास यांची आवड आहे. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. प्रेम सहानुभूती आणि आदर हे तुमचे वैशिष्ट्य आहेत. उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्य, दागिने, कपडे, वाहने, घरे यांच्या तुम्हाला आकर्षण असते. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात मात्र तुमचा स्वभाव खर्चिक आहे. तुम्हाला प्राणी प्रिय असतात. तुम्ही अत्यंत बुद्धिमान, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. हातातील कार्य सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही पूर्वनियोजन करतात.
तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुमच्यामध्ये संयम आहे. तुमची इच्छा शक्ती दांडगी आहे. प्रत्येक विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करतात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उत्साही आहे. वृत्ती संशोधक आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आशादायक आहे. तुम्हाला उत्तम भाषा चातुर्य आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि विश्लेषण करण्याची वृत्ती सूक्ष्म आहे. बढाईखोरपणा आणि उतावळेपणा टाळला पाहिजे. वयाच्या ४५ व्या वर्षी उत्कर्ष होतो.
व्यवसाय:- बौद्धिक, व्यवसाय, बँकिंग, सेल्स मॅनेजर, आयात निर्यात, पुस्तक विक्रेता, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरियर डेकोरेटर, वकील, डिपार्टमेंट स्टोअर्स, डॉक्टर, केमिस्ट, तंत्रज्ञ.
शुभ दिवस:- रविवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, नारंगी आणि निळा.
शुभ रत्न:- माणिक, पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521