आजचे राशिभविष्य मंगळवार,२४ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन शुक्ल दशमी. शरद ऋतू. 
राहुकाळ -दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज शुभ दिवस” *विजयादशमी (दसरा)* 
नक्षत्र – धनिष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कुंभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. सर्व स्वप्ने साकार होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरी/व्यवसायात अनुकूल घटना घडतील. मन आनंदी राहील. सर्व काही सुखकारक घडेल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास कार्यसाधक होतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. मानासारकी कामे होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अपेक्षे पेक्षा कमी प्रतिसाद मिळेल. मात्र कष्ट वाढविल्यास फायदा होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रिय व्यक्तीसाठी खरेदी कराल. प्रेमात यश मिळेल. आनंदी राहाल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  आप्त भेटतील. नवीन ओळखी होतील. मौल्यवान खरेदी कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संतती कडून चांगली बातमी समजेल. गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल.सोने खरेदी घडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र कालावधी आहे. काही नाराज ग्रहांचा अनुभूती येईल. आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम लाभाचा कालावधी आहे. मन प्रसन्न राहील. अनेक लाभदायक योग घडत आहेत.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक सौखासाठी अत्यंत चांगला दिवस आहे. स्थावर संपत्तीत वाढ होऊ शकते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सिद्धी प्राप्त करून देणारा दिवस आहे. गूढ उलगडतील. गुरू सन्निध लाभेल. सर्व प्रकारचे लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यय स्थानात चंद्र भ्रमण आहे. अधिक मेहनत घेतल्यास चांगले लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
 
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!