आजचे राशिभविष्य मंगळवार,३१ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन कृष्ण तृतीया. शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस”  
नक्षत्र – रोहिणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. शेअर्स मधून लाभ मिळतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्व राशीतील चंद्र तुम्हाला उत्साह प्रदान करेन. कलाकारांना उत्तम दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. अति धाडस नको. नेहमीची कामे चालु ठेवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. मोठी कामे पार पडतील. मौल्यवान दागिना मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. भिन्न लिंगी व्यक्ती पासून फायदा होईल. समर्थन लाभेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  नवम चंद्र आहे आणि हर्षल शुक्राशी शुभ योग करत आहे. विशेष काहीतरी घडेल. प्रतीक्षा संपेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल दिवस आहे. अष्टमात चंद्र आहे. अति धाडस नको. आरोग्य सांभाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल शुक्र भौतिक सुखाची बरसात करेल. मौल्यवान खरेदी होईल. वाहन सौख्य लाभेल. प्रेमात यश.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. अर्थकारण मजबूत होईल. नोकरीत महिलेकडून लाभ होतील. वरिष्ठ खुश राहतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. सरकारी कामात दिरंगाई जाणवेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) घरगुती कामात लक्ष घालावे लागेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. चैनीवर खर्च कराल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आवक वाढेल. व्यवसायात वाढ होईल. नवीन संधी चालून येतील. कायद्याचा प्रश्न निर्माण होईल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.