ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र शुक्ल पंचमी. वसंत ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे.
चंद्रनक्षत्र – कृतिका(सूर्य)/(संध्याकाळी ८.५० नंतर) रोहिणी (चंद्र).
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राची रवीशी लाभ योग तर गुरुशी युती आहे. अनुकूल दिवस आहे. संपत्ती वाढेल. विपुल धन धान्य होईल. सौख्य लाभेल. खर्च वाढतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. वाहन सुख लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. सत्संग लाभेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कुलदेवतेची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. प्रवास घडतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. षष्ठ स्थानी शनी आहे. भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील. खर्च सुद्धा वाढेल. वहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल. कोर्टात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. गृह सजावट कराल. वाहन सौख्य लाभेल. येणी वसूल होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय प्रांतात उत्तम यश लाभेल. विक्री क्षेत्रात प्रगती कराल. गुंतवणुकीतून उत्तम लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र गुरू युती आहे. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. मैदान गाजवाल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायिक प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. प्रणय रम्य दिवस आहे. प्रसन्न वाटेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
