विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून ३८ उमेदवारांची यादी जाहीर 

नाशिक जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा या यादीत समावेश 

0

मुंबई,दि,२३ ऑक्टोबर २०२४ – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा या यादीत समावेश आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या यादीची घोषणा केली.अजित पवार बारामती मतदार संघातून लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते येवला मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

नुकतेच भाजपा आणि शिंदे शिवसेना गटाच्या विधानसभा निवडणूक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.त्यानंतर आज राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये एकूण ३८ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीमध्ये अजित पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख  नेत्यांचाही समावेश आहे.

पहिली एकूण ३८ नावांची यादी जाहीर
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन-  आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
शहापूर- दौलत दरोडा
पिंपरी- अण्णा बनसोडे
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले – किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज आहिरे
चंदगड – राजेस पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.