मुंबई- खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुंबई मध्ये रहात असलेल्या खार निवासस्थानी हायव्होल्टेज ड्रामा नंतर . राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खार पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले. होते यावेळी राणा दाम्पत्य आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.त्यानंतर खार पोलिसांनी त्याना ताब्यात घेऊन भादंवि कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्यावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत कडेकोट बंदोबस्तात पोलिसांच्या गाडीतून खार पोलिस ठाण्यात आणले. राणा दाम्पत्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
यावेळी राणा दांपत्याने वॉरंट दाखवण्याची मागणी केली.त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी इमारतीखाली आणलं. दुसरीकडे घराबाहेर मोठ्याप्रमाणावर शिवसैनिक जमा होते त्यांना राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलीस सुरक्षेत राणा दाम्पत्याला पोलीस खार पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
A case is registered at Khar Police Station against MLA Ravi Rana and MP Navneet Kaur Rana under sections 153(A), 34, IPC r/w 37(1) 135 Bombay police act. Both are taken into custody from their house at Khar. Further investigation is being done by Khar PS: Mumbai Police
— ANI (@ANI) April 23, 2022
राणा दाम्पत्यांची आजची रात्र खार पोलीस ठाण्यात जाणार
राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर आता उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.त्यामुळे त्यांची आजची रात्र खार पोलीस ठाण्यात जाणार आहे राणा दाम्पत्या वर १५३ अ हे कलम लावण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत.
एखादं प्रक्षोभक वक्तव्य करुन जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण केलं जात असेल हे कलम लावलं जातं. या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसल्याने आरोपीला न्यायालयासमोर हजर करावं लागतं. पोलीस कस्टडी हवी असल्यास तशी मागणी पोलीस करु शकतात.