Redmi12,5G स्नॅपड्रॅगन 4 Gen,2 प्रोसेसरचा फोन १ ऑगस्टला भारतात होणार लॉन्च !
Geekbench वर हा फोन दाखवण्यात आलेला 5G फोन आहे. १ ऑगस्ट रोजी लॉन्च होणार्या Redmi 12 या फोन बाबत कंपनीकडून अद्याप हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, की तो 4G आहे की 5G.
नवी दिल्ली,दि. २३ जुलै २०२३ – Redmi 12 नुकतेच कंपनीने जागतिक स्तरावर लॉन्च केले. आता हा फोन लवकरच भारतातही लॉन्च होऊ शकतो. पण कंपनी त्याचे 4G प्रकार लाँच करणार की 5G प्रकार लॉन्च करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Redmi 12 5G फोन बेंचमार्क प्लॅटफॉर्म गीकबेंचवर दिसला आहे. डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट दिसला आहे. हे त्याच मॉडेल क्रमांकासह BIS वर देखील दिसले आहे. भारतात लॉन्च होणार्या या फोनबद्दल आणखी कोणती माहिती समोर आली आहे ते जाणून घेऊया.
Redmi 12 चे भारतातील लॉन्च आता अगदी जवळ आले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की हा फोन भारतात 1 ऑगस्ट रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. लॉन्चच्या अगोदर, फोन आता Geekbench वर दिसला आहे जे सूचित करते की तो लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो. त्याचा मॉडेल क्रमांक 23076RN4BI असल्याचे सांगितले जाते. प्रोसेसर 2.2GHz वर 8 कोरसह आहे. सोबत Adreno 613 GPU पण आहे.
Geekbench वर दाखवलेला हा फोन 5G फोन आहे.1ऑगस्ट रोजी कंपनीकडून लॉन्च होणार्या Redmi 12 साठी अद्याप हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, की त्याची 4G आवृत्ती लॉन्च केली जाईल की 5G. तथापि, Geekbench वर दर्शविलेले चिपसेट Snapdragon 4 Gen 2 5G असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, फोन 5G असण्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. ऑपरेटिंग सिस्टमसाठी येथे Android १३ चा उल्लेख आहे.
Redmi 12 च्या बेंचमार्क स्कोअरबद्दल बोलताना, फोनने प्रभावी आकडे गाठले आहेत. फोनने सिंगल कोरमध्ये ९१६ गुण मिळवले आहेत तर मल्टी कोर चाचणीत २,१०६ गुण मिळवले आहेत. वर नमूद केलेल्या माहिती व्यतिरिक्त, सूचीमध्ये इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आता १ ऑगस्टला लॉन्च होण्यापूर्वी कंपनी याबद्दल आणखी पुष्टी देते का हे पाहावे लागेल.