मुंबई,दि,७ एप्रिल २०२५ – अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दणका दिला आहे.अक्षय शिंदे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचाही आदेश दिला आहे. तसंच एक विशेष पथक गठीत करुन प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली ही समिती स्थापन करण्यास सांगण्यात आलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने समितीला सगळ्या बाजूंनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.राज्य सरकारने आदेशावर स्थगिती आणण्याची मागणी केली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची मागणी फेटाळली. निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने होती आदेशावर स्थगिती देण्याची मागणी केली होती.
कोर्टाच्या आदेशानंतर वकील असीम सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पोलीस केवळ सॉफ्ट टार्गेट आहेत. पोलिसांवर कुणी दबाव आणला ? आणि त्याचा इनकाउंटर कोणी करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल. याचा थेट संबंध बदलापूरच्या भिंतीवर ‘अब बदला पुरा हुआ’ असे लिहिले . ज्या नेत्यांनी बेकायदेशीरपणे वर्तन केले आहे त्या सगळ्या नेत्यांना कायद्याच्या कचाट्यात घेण्याची गरज आहे. ज्यांनी अक्षय शिंदेच्या एनकाउंटरचं समर्थन केलं आहे ते अत्यंत जुनाट विचाराचे आणि बेकायदेशीर डोक्याचे लोक आहेत, हुकूमशाही पद्धतीचे नेते आहेत”
पुढे ते म्हणाले,”ज्यांनी अक्षय शिंदेंच्या हत्येचं समर्थन केलं ते बेकायदेशीर लोक आहे. सत्ता आपल्या हातात असल्याने सत्ताधीश बनू पाहणारे हुकूमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत त्यांनी अक्षय शिंदेंच्या मृत्यूचं राजकारण, भांडवल आणि समर्थन केलं. ज्यांनी महत्त्वाच्या पदावर असताना असं म्हटलं की, पोलिसांना काय आम्ही बंदुका खेळण्यासाठी दिल्या आहेत का ? ते काल कोल्हापुरात येऊन गेले. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे”.