डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या पुस्तकाचे २९ सप्टेंबरला प्रकाशन

0

नाशिक,२६ सप्टेंबर २०२२ – येथील ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या ‘जाणता हृदय हे…’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ या दिवशी होत आहे.

‘शब्दमल्हार प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध होत असलेल्या या पुस्तकात हृदयाची काळजी, हृदयरोगावरील उपाय आणि शस्त्रक्रियानंतरची माहिती याविषयीचे शास्त्रीय लेखन असून हृदय रोगाला कारणीभूत ठरणारी मानवी जीवनशैली यावरही डॉ. धर्माधिकारी यांनी प्रकाशझोत टाकला आहे.

ज्येष्ठ डॉ. लेखा पाठक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि संपादक स्वानंद बेदरकर यांची प्रमुख उपस्थित असून महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होईल; तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘शब्दमल्हार प्रकाशन’ आणि श्रीसाईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट च्यावतीने करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!