आठवणीतला चहा..पुन्हा एकदा बनविणार नॉस्टॅल्जिक..

जनस्थान आणि ‘११:३० सलीम व्हॉट्सअप ग्रुपतर्फे शनिवारी आयोजन 

0

नाशिक,२३ डिसेंबर २०२२ – चहा हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. त्याच्याभोवती अनेक आठवणी पेरून ठेवलेल्या असतात. चहा घेतानाच अनेकांची मैत्री जमलेली असते, तर चहा घेतानाच अनेकांची भांडणेही झालेली असतात. कॉलेजलाईफमध्ये तर हा चहा म्हणजेच सर्वस्व असतो. त्याच्याशी अनेक भावना निगडीत असतात. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी

कोरोनामुळे तब्बल ३ वर्षांनतर पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज ‘जनस्थान’ व  ‘११:३० सलीम व्हॉट्सअप  ग्रुपतर्फे‘आठवणीतला चहा’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत  सलीमची चहा टपरी श्रद्धा पेट्रोल पंपा शेजारी कॉलेज रोड येथे करण्यात आले आहे.

Janasthan group

कॉलेज जीवन म्हटले की अनेकांना आठवते ती सलीम मामूची चहाची टपरी. अनेकजण या टपरीवर चहाचा आस्वाद घेत गप्पाबरोबर कडू गोड आठवणी शेअर करत होते. मग त्या प्रेमाच्या गोष्टी असो अथवा राजकीय, अनेकांनी या सलीमच्या चहाच्या आस्वादाने आपली स्वप्ने रंगवली आणि त्यात यशस्वी झाले, काहीजण अजूनही वाटचाल करीत आहेत.याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आज, शनिवार २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत नाशिकमधील कलावंतांच्या आणि या चहा कट्ट्यावरच्या व्हॉटसअॅप ग्रुपतर्फे हे आयोजन करण्यात आले आहे.

सगळ्या मित्र मैत्रिणींसोबत आपल्या आठवणीचा चहा घेण्यासाठी सकाळी ८ ते १२ या वेळेत विनामूल्य चहा देण्यात येणार असून, आपण उपस्थित राहावे असे आवाहन जनस्थान ग्रुपचे मुख्य अभय ओझरकर व ११:३० @ सलीम व्हॉट्सअॅप ग्रुपचे प्रसाद गर्भे यांनी केले आहे.

रवी जन्नावार, नंदन दीक्षित हे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आर. जे. भूषण मटकरी यांची असून या आठवणीतल्या चहासाठी रिदम साउंड, लाईट्स व इव्हेंट्स, गोदा श्रद्धा फाउंडेशन व द बलून.इन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.