सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे निधन 

कर्जतच्या एन.डी.स्टुडिओ मध्ये केली आत्महत्या 

0

मुंबई,२ ऑगस्ट २०२३ –चित्रपट क्षेत्रातून अतिश दुःखद बातमी येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे.कर्जतच्या त्यांनीच बनवलेल्या एन.डी.स्टुडिओ मध्ये केली आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहेत.वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आपले जीवन संपवले नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.नितीन चंद्रकांत  देसाई यांच्या आत्महतेने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.

२००५ साली त्यांनी या एन.डी.स्टुडिओची निर्मिती केली होती . नितीन देसाई यांनी का आत्महत्या केली याचे कारण अद्याप समोर आले नाही.  एन.डी.स्टुडिओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. ८० च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.’1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!