नाशिक,दि,८ जानेवारी २०२४ –नाशिकचे प्रसिद्ध युवा तबलावादक सुजीत काळे यांना तबला वादनासाठी प्रसारभारती ,भारत सरकार यांच्या तर्फे नुकतीच प्रतिष्ठेची ‘ ए ग्रेड ‘प्रदान करण्यात आली आहे.
सुजीत काळे हे स्व. पं. भानुदास पवार ,पं. नितीन पवार आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य आहेत. भारतभर स्वतंत्र तबलावादनासोबतच कंठसंगीत ,वाद्यसंगीत आणि कथक नृत्य यांच्या साथसंगतीसाठी नामवंत कलाकारांसोबत अनेक महोत्सवातून त्यांनी आपली कला सादर केली आहे.
याआधी त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.सुजीत काळे सध्या ते के.के.वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे तबला विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून भारत आणि परदेशातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल संगीत क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.