नवी दिल्ली,दि, ९ एप्रिल २०२५ – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो रेट कपात जाहीर केली आहे.गेल्या ५ वर्षात पहिल्यांदा आरबीआय ने रेपोरेट कमी केला आहे. आरबीआयने त्वरित परिणामासह ०.२५ टक्के घट जाहीर केली आहे. या आधी हा रेपोरेट ६.२५ होता आता ०.२५ केल्यामुळे सामान्य कर्जदाराला दिलासा मिळणार आहे. परिणामी कर्जाचा इएमआय कमी होणार आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास प्रभावित होऊ शकतो. याचा विचार करता भारतीय रिझर्व बँक व्याजदरात ७५ ते १०० बेसिस पॉईंटची कपात करू शकते. तज्ज्ञांच्या मते महागाई वाढण्याची शक्यता नसल्याने आरबीआय या संदर्भातील निर्णय घेण्याबाबत विचार करु शकते.
आरबीआयच्या ६ सदस्यांच्या पत धोरण विषयक समितीची बैठक फेब्रुवारी मध्ये झाली होती. त्यावेळी २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षात रेपोरेट मध्ये पहिल्यांदा कपात झाली होती. आता आरबीआय पुढील आठवड्यात पत धोरण विषयक समितीची बैठक घेणार आहे. या बैठकीत साधारणपणे २५ बेसिस पॉईंटची कपात होईल असा अंदाज आहे. मात्र,बदललेल्या स्थितीत वेगळा निर्णय होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, “आर्थिक धोरण समितीने (एमपीसी) पॉलिसी रेपो दर 25 बेस पॉईंट्सवरून त्वरित परिणामी 6% पर्यंत कमी करावा यासाठी मतदान केले. तज्ज्ञांच्या मते आरबीआयला वैश्विक आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी पावलं उचलावी लागतील. अमेरिका आणि जागतिक आर्थिक व्यवस्था मंदीतच्या गर्तेत सापडली तर त्याचा परिणाम भारतावर पाहायला मिळेल. जागतिक बाजारात कमोडिटीच्या किमती घसरल्या तर भारतीय उद्योगावर याचा परिणाम होऊ शकतो. आरबीआय इतर अर्थव्यवस्थांसह संतूलन कायम राहू शकतं. आरबीआयनं मे २०२२ आणि फेब्रुवारी २०२३ दरम्यान २५० बेसिस पॉईंटनं वाढवले होते. वैश्विक स्थिती पाहता यामधील कपातीचा निर्णय आरबीआयला घ्यावा लागेल, अशी शक्यता वाढली आहे.