नाशिक,दि,१० डिसेंबर २०२४ –पवार तबला अकॅडमी आयोजित व अल्फारंभ एज्युकेशन अँड कल्चरल फाउंडेशन प्रस्तुत पं. भानुदासजी पवार स्मृती संगीत समारोह (वर्ष २७ वे) निमित्ताने प्रसिद्ध तबलावादक व गुरु तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक १४ डिसेंबर संध्याकाळी ६ वा. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास सभागृहात ही मुलाखत असणार आहे.
नाशिकमध्ये बऱ्याच वर्षांनी गुरुजींची मुलाखत होत आहे.गुरुजींचे विचार सर्व कलाकारांना तसेच गायन,वादन,नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना/शिक्षकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे या संवादक म्हणून मुलाखत घेणार आहे. पंडितजींबरोबर ज्ञानेश्वर कासार हार्मोनियम संगत करणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पं. सुरेश तळवळकर यांचे नाशिक मधील शिष्य कल्याण पांडे अद्वय पवार व कुणाल काळे यांचे तबला सह वादन होईल त्यांना हार्मोनियम साथ संगत प्रतीक पंडित करतील.कार्यक्रमाचे निवेदन स्नेहा रत्नपारखी ,तंत्र शुभम जोशी (फेदर टच स्टुडिओ) साऊंड सचिन तिडके करणार आहेत.
समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयंत भातंबरेकर ,प्रसिद्ध संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे तसेच लातूर मधील जानाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता ठोंबरे लाभले आहेत.कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे.तरी सर्व कलारसिकांनी या समारोहास उपस्थित राहावे असे आवाहन sws चे रघुवीर अधिकारी व पवार तबला अकॅडमीचे नितीन पवार यांनी केले आहे.