रोहित शर्माचा वर्ल्ड रिकॉर्ड !

0

मुंबई – कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रोहित शर्माला इंग्लंड विरुद्ध एजबॅस्टन कसोटीत खेळता आलं नव्हतं.कोरोनावर मात करून आल्यानंतर काल रोहित शर्माने मैदानावर पुनरागमन केल्यानंतर रोहितने विश्वविक्रम केलायं  रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय संघाने कमालीच प्रदर्शन केलं. इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. त्याच बरोबर रोहितने वर्ल्ड रेकॉर्डही बनवला. सलग १३ टी २० सामने जिंकणारा रोहित शर्मा टी २० क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार बनला आहे. त्याच बरोबर रोहित शर्मा एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर टी २० मध्ये एक हजार  धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे.

याआधी हे रेकॉर्ड अफगाणिस्तानच्या असगर अफगाण आणि रोमानियाच्या रमेश सतीसनच्या नावावर होता. त्यांनी टी २० मध्ये सलग १२ सामने जिंकले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली सर्वच फॉर्मेटमध्ये भारताचा हा १५ वा विजय आहे. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी २० मध्ये १४ चेंडूत २४ धावा फटकावल्या. यात ५ चौकार होते. कर्णधार म्हणून परदेश भूमीवर रोहित शर्माची ही पहिली सीरीज आहे. मागच्यावर्षी टी २० वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉर्मेटसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी निवड केली.

टी २० मध्ये १००० धावा पूर्ण करणारा रोहित जागतिक क्रिकेटमधील दहावा कर्णधार आहे.टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला सलग १३ सामने जिंकता आले नाहीत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.