नवी दिल्ली,दि.१९ मे २०२३ – भारतात लागू असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.नागरीकांना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याचे निर्देश दिले आहेत.आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली असून या नोटा आता चलनातून बाद होणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एकावेळी २० हजार रुपये, म्हणजेच २००० रुपयांच्या १० नोटा बँकेत बदलून त्यांच्या जागी छोट्या नोटा नागरिकांना घेता येणार आहेत. सर्व बँकांमध्ये मध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा असेल.बँकेने म्हटले आहे की ते चलनातून २,००० रुपयांच्या नोटा काढून घेत आहेत आणि लोक या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलू शकतात.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची १९ प्रादेशिक कार्यालये २३ मे पासून कमी मूल्याच्या नोटांसह २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यास सुरुवात करतील.
नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांवर एका रात्रीत बंदी घातल्यानंतर रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटांची छपाई सुरू केली होती.यानंतर २०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. आरबीआयने बँकांना २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत २००० च्या नोटा बदलण्याचे निर्देश दिले आहेत. एका वेळी जास्तीत जास्त वीस हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जातील.यापुढे बँका २००० च्या नोटा जारी करणार नाहीत.