ती खलनायिका परत येतेय..स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या मालिकेतून दमदार पुनरागमन

0

मुंबई, दि. १० जुलै २०२५ – Rupali Bhosale new serial स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन आणि दर्जेदार मालिकांचा अखंड प्रवाह सुरु असतानाच, आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘लपंडाव’ या नव्या मालिकेमार्फत लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील खलनायिका संजना या भूमिकेने रसिकांच्या मनात घर केलेली रुपाली आता एका नव्या आणि अधिक दमदार भूमिकेत झळकणार आहे.

या नव्या मालिकेत ती तेजस्विनी कामत ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तेजस्विनी म्हणजेच ‘सरकार’ — घरात आणि ऑफिसमध्ये तिचंच राज्य. तिच्यासाठी प्रेम आणि नात्यांपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा आहे. ही व्यक्तिरेखा धडाडीची, सत्ताकांक्षी, आणि ग्लॅमरस असून, ती मालिकेला एक वेगळं गूढ आणि राजकीय वळण देणार आहे.

रुपाली भोसलेने या नव्या भूमिकेबाबत सांगितले, “‘लपंडाव’ ही माझ्यासाठी एक संधी आहे वेगळं काहीतरी करण्याची. तेजस्विनी म्हणजे केवळ एक पॉवरफुल महिला नाही तर एक तत्त्वांवर चालणारी व्यक्ती, जिला तिच्या निर्णयांवर ठाम विश्वास आहे. तिचा लूक, तिचं बोलणं आणि तिचं वागणं – हे सगळं मी आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्णतः वेगळं आहे. संजना नंतर प्रेक्षकांची जी एक ठरलेली प्रतिमा होती, ती मोडून काढायची जबाबदारी मी सरकारच्या रूपात घेतली आहे.”

(Rupali Bhosale new serial)‘लपंडाव’ मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन आधुनिकतेला अनुसरून केलं गेले आहे. या मालिकेत प्रेम, धोका, सत्ताकांक्षा आणि कौटुंबिक संघर्षांचा अफलातून मिलाफ पाहायला मिळणार आहे.

लवकरच स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘लपंडाव’ ही मालिका नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे. रुपाली भोसलेची ही नवीन इनिंग प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा अधिराज्य गाजवेल, यात शंका नाही.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!