रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात : रशियाचे युक्रेनवर अनेक ठिकाणी मिसाईल हल्ले

0

नवी दिल्ली –  रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्या नंतर रशियाने युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी मिसाईलहल्ले करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. याच दरम्यान मिसाईल हल्ल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.यूक्रेन लष्कराने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी म्हटले आहे. आमचा यूक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पूर्व युक्रेनच्या दोनेत्स्कमध्ये मिसाईल हल्ले  रशियाने सुरू केल्याचं दिसून येत आहे युक्रेनच्या अनेक शहरांत स्फोट झाला असल्याचं वृत्त हाती येत आहे. ओडेसा या ठिकाणी दोन महाशक्तिशाली स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. तर युक्रेनची राजधानी किवमध्येही दोन स्फोट झाले आहे. सीएनएननं याबाबतचं वृत्त दिलंय. क्रामटोरस्क, बर्डियास्क आणि निकोलन शहरांत स्फोट झाले असल्याचं सांगितलं जातंय.

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गुरुवारपासून ३० दिवसांची आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. वाल्मादिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेता युक्रेननं आणिबाणी घोषित केली आहे. युक्रेनमधील अनेक देशांच्या दूतावासातील नागरिकांनाही आपआपल्या देशात परतण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मॉस्को ने आपल्या युक्रेनमधील नागरिकांना आणि दूतावास यांना बाहेर काढलंय. पश्चिमेतल्या अनेक देशांनी आता रशियाविरोधात प्रतिबंध लागू करण्यात सुरु केली आहे.

युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अद्याप अडकले आहेत. हे सर्व नागरिक भारतात लवकरात लवकर परतण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहेत.कालच  २४० भारतीय नागरिक युक्रेनहून सुरक्षित भारतात दाखल झाले.आज  गुरुवारी १८२ भारतीय नागरिकांना विशेष विमानाने नवी दिल्लीत आणण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!