शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात 

0

मुंबई,१० मार्च २०२३ – दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र  ईडीने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही.परंतु भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सदानंद कदम यांना मुंबईला आणण्यात येणार असून त्यांची मुंबईतच कसून चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे.

उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं असून ईडीचं पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालं आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याप्रकरणात कदम यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तसेच अनिल परब यांचीही चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरीही छापे मारण्यात आले होते. साई रिसॉर्टचं खरेदी विक्री प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावाचा वापर करून डमी मालक उभा केला होता. त्यानंतर कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वत:ची ओळख लपवली होती. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.