नाशिक – कोव्हीड -१९ व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता नाशिक मध्ये ३ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यिक व समितीच्या पदाधिकाऱ्यांना लसीकरण बंधनकारक असून ” नो व्हॅक्सीन नो एन्ट्री” असे धोरण आपण स्वीकारत आहोत अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. काही वेळापूर्वी आपल्या संदेशातून जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या आहेत.
कोव्हीड -१९ व्हायरसचा नवीन व्हेरिएंटओमिक्रॉन नुकताच जगा मध्ये आढळून आला आहे त्याचा प्रसार फार गतीने होणार आहे याची भीती व्यक्त करण्यात आली .या पार्श्वभूमीवर या साहित्य संमेलनात खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याबाबत आयोजकांना सूचित करण्यात आले असून दोन पैकी एक डोस बंधनकारक असून फक्त वयवर्ष १८ वर्षा आतील असलेल्यांना ही अट लागू नसेल असे ही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले.
नव्या व्हेरियंटचा धोका बघता जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर असून संमेलनात ‘नो व्हॅक्सिन नो एंट्री’ हा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्या राजकीय व्यक्तींपासून, सारस्वत व आयोजकांपर्यंत सर्वांना करोना लसीचे दोन पैकी एक डोस घेतला असणे बंधनकारक असणार आहे. एंट्रीच्यावेळी डोस घेतल्याचा मॅसेज, सर्टिफिकेट दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.