श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे २ जूनला मुखमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक, १ जून २०२५ – Saibaba Heart Institute Nashik उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत उल्लेखनीय ठसा उमटवणाऱ्या श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन २ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई नाका येथील हॉटेल कोर्टयार्डसमोर नवीन वास्तूत स्थलांतर झालेल्या या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा दुपारी ४ वाजता पार पडणार आहे.या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
🏥 हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:(Saibaba Heart Institute Nashik)
२०० खाटांची सुविधा
२४x७ आपत्कालीन सेवा
तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम
६ सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स
२ अत्याधुनिक कॅथलॅब्स
सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व उपचार उपलब्ध
रुग्णसेवेच्या नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे नाशिककरांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला उच्च दर्जाची आरोग्यसेवा सहज उपलब्ध होणार आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवाभावी प्रकल्पाला आशीर्वाद द्यावेत,असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:७०४१७०४११४ संपर्क साधावा,असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
[…] […]