अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला : मध्यरात्री घडली घटना ,हल्ल्याचे गूढ मात्र कायम

0

मुंबई,दि,१६ जानेवारी २०२४ – अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या घरात चोरीच्या उद्देशाने एक अज्ञात व्यक्तीने चाकूहल्ला केला असून हल्ल्याचे गूढ मात्र कायम आहे. मिळालेल्या माहिती नुसार चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती सैफ च्या घरात शिरला होता. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा त्याला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याचक्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.सैफवर रुग्णालयात उपचार सुरू असून तैमुर आणि जेह ही दोन्ही मुलं सुरक्षित असल्याचं करीनाच्या टीमने सांगितले आहे.

सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर कुटुंबीय ठीक आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना संयम राखण्याची विनंती करतो. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असल्याने मीडिया किंवा चाहत्यांनी याप्रकरणी कोणतेच अंदाज वर्तवू नयेत. तुम्हा सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद’, अशी माहिती करीनाच्या टीमकडून देण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणी हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांच्या १५ टीम तयार केल्या आहेत.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र मुंबईतील वांद्रे येथे राहत असलेल्या इमारतीत १२ व्या मजल्यावर घर असताना चोराने एन्ट्री केली कशी? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांकडून यासंदर्भातील तपास सुरू आहे. या सैफ अली खानच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारतीचीही तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीच्या शेजारी लहान दोन ते तीन मजली इमारत आहे. तिथे गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर नेमका कोणत्या रस्त्याने घरात शिरला असावा? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!