महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविणार
नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांची ग्वाही
नांदगाव,दि.७नोव्हेंबर २०२४ – नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे या भागातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. मात्र, या महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून प्रत्येक गावातील घरामध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल. त्यासाठी अहोरात्र काम करेन, अशी ग्वाही अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी दिली. या कार्यासाठीच आपण आपले आशिर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावे. आपली भक्कम साथच विकासाचा मार्ग खुला करणार आहे, असेही ते म्हणाले. श्रीराम नगर, फुलेनगर, हिंगणवाडी, वडाळकर वस्ती, गंगाधरी, मल्हारवाडी, क्रांतीनगर येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी तालुका असून या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. वेळेवर पाणी येत नाही. त्यामुळे शासनाच्या जल जीवन मिशन तसेच तसेच विविध योजनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. नागरिकांना हे पाणी शुद्ध स्वरूपात मिळायला पाहिजे, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला जाईल आणि गावागावात नळाद्वारे पाणी सर्वत्र पोहोचेल यासाठीच आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, नांदगाव लगत असलेल्या गावांमध्ये रस्त्याची अडचण आहे. पक्के व चांगले रस्ते होणे गरजेचे आहे. गेली पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आला मात्र त्या निधीचा उपयोग सकारात्मक कारणासाठी झालेला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकमताने मला मागणी घालून येथे उमेदवारी करायला लावली. त्यामुळेच मी तुमचा आग्रह मोडू शकलो नाही. आता मी उमेदवारी केली आहे. नांदगावच्या विकासासाठी तुमची भक्कम साथ मला हवी आहे. त्याजोरावरच विकासाचा भुजबळ पॅटर्न राबवू, असे त्यांनी ठासून सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मविप्र संचालक अमित पाटील, डॉ वाय पी जाधव, भगवान सोनवणे, शेखर पगार, बाळू बोरकर, हिंगणवाडी येथे महादू मदने राजू पवार, भगवान देशमुख, भास्कर मिसर, संतोष पवार, अमोल पवार, गंगाधरी येथे संजय सोमासे, सचिन जेजुरकर, विकी जाधव, भरत जाधव, गंगा पाटील, गोविंद सोनवणे, रिंकू जाधव, सरपंच बापू इगे, संजय खैरनार, भरत जाधव, श्रीराम नगर येथे बाळासाहेब जेजूरकर, लक्ष्मण खैरनार, संदीप सुरसे, बाळासाहेब महाजन, किसन जगधने, दिलीप सुरसे, अण्णा महाजन, वाल्मिक महाजन, सुनील महाजन, अशोक पाटील, विलास जगधने, देवराम जगधने, धोंडीराम जगदने, रामा माळी, भास्कर ठाकरे, बाळू माळी, राम भोई, अनिल आहेर, शिवाजी जगधने, भगवान महाजन, आदी उपस्थित होते.
फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत
प्रत्येक गावात फटाक्यांच्या आतषबाजीत अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचे स्वागत करण्यात आले.काही ठिकाणी फेटा बांधून तर काही ठिकाणी शाल, श्रीफळ व फुलांची उधळण करीत भुजबळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.