समृद्धी महामार्गावर भीषण अपघात नाशिकच्या १२ भाविकांचा मृत्यू :२३ जण जखमी 

0

छत्रपती संभाजीनगर,दि. १५ ऑक्टोबर २०२३- वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला टेमो ट्रॅव्हलरने पाठीमागून दिलेल्या  धडकेत नाशिकचे १२ भाविक जागीच ठार झाले आहे.तर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतात ५ पुरुष ६ महिला व एक चार महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. ट्रॅव्हलमधील नाशिकचे भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाणा येथे गेले होते. दर्शन करून परतत असताना हा भीषण अपघात झाला. तसंच अपघातातील जखमींवर  वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.टेमो ट्रॅव्हलरमध्ये एकूण ३५ प्रवासी होते

याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. खाजगी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवलं होतं. ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जोराची आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार वर्षाचा चिमुकल्याचा देखील समावेश आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदतकार्य सुरू केलं असून घटनास्थळावरून जखमी रुग्णांना तात्काळ स्थानिक रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची गांभीरता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय सज्ज करण्यात आलं असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अपघातातील जखमीची प्राप्त नावे खालील प्रमाणे 
1)  दगु  मसके
2) गौतम तपासे
3) कार्तिक
4)शांताबाई मस्के
5)दुर्गा
6)धनश्री सोळसे
7)लखन सोळसे
8)सोनाली त्रिभुवन
9)श्रीहरी केकाणे
10)सम्राट केकाणे
11)अनिल साबळे
12)संदेश अस्वले
13)परकाश गांगुर्ड
14)तन्मय  कांबळे
15)युवराज साबळे
16)गिरतेशवरी अस्वले
छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय
1) पुजा अस्वले
2)वैशाली अस्वले
3)ज्योती केकडे

या अपघातातील मृतांची नावे
1) तुनुश्री लखन सोळसे वय पाच वर्षे राहणार समता नगर नाशिक
2) संगीता विलास अस्वले 40 वर्षे राहणार वन सगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक
3) पंजाबी रमेश जगझाप 38 वर्ष राहणार राजु नगर नाशिक
4) रतन जमदाडे वय 45 वर्ष राहणार संत कबीर नगर वैजापूर
5) काजल लखन सोळसे वय 32 वर्ष राहणार समता नगर नाशिक
6) रजनी गौतम तपासे वय 32 वर्षे राहणार गवळणी नाशिक
7) हौसाबाई आनंदा शिरसाट वय 70 राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक
8) झुंबर काशिनाथ गांगुर्डे वय 58 राहणार राजु नगर नाशिक
9) अमोल झुंबर गांगुर्डे वय 18 वर्षे राजु नगर नाशिक
10) सारिका झुंबर गांगुर्डे वय 40 वर्ष राजु नगर नाशिक
11) मिलिंद हिरामण पगारे वय 50 वर्ष कोकणगाव ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक
12) दीपक प्रभाकर केकाने वय 47 पिंपळगाव बसवंत नाशिक
हे मृत झाले आहेत

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!