समृद्धी महामार्गावर महेंद्रा XUV700 आणि महेन्द्रा THARचा थरार चित्रित   

नियोजित चित्रनगरी असलेल्या इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्ग येथे पहिल्यांदाच जाहिरातीचे चित्रीकरण सुरू

1

नाशिक,दि. १८ सप्टेंबर २०२३ – नाशिक जवळील इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गवर महेंद्रा XUV 700 आणि महेन्द्रा THAR चा थरार कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आला आहे.नागरीकांसाठी हा महामार्ग अद्याप सुरु झाला नसला तरी या मार्गावर महेंद्रा XUV 700 आणि महेन्द्रा THAR या चारचाकी वाहनाचे चित्रीकरण आज सुरु झाल्यामुळे नाशिककरांचे स्वप्न असणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या नावे सुरू होणाऱ्या  इगतपुरी तालुक्यातील नियोजित  चित्रनगरीची या चित्रिकरणाने मुहूर्तमेढ रोवली आहे.

समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच चित्रीकरण होत असून अजय देवगण अभिनीत मैदान या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले अमित शर्मा या जाहिरातीचे चित्रीकरण करत आहे  Chrome Pictures या जाहिरातीची निर्मिती करत आहे

चित्रीकरणासाठी लाभले यांचे सहकार्य हे चित्रीकरण होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ,दादाजी भुसे ,एमएसआरडीसी चे राध्येशाम मोपलकर,अभिनेते सुशांत शेलार,सचिन जोशी,  ,महेंद्र पवार ,अभय ओझरकर ,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे नाशिक समिती प्रमुख श्याम लोंढे ,सदस्य रमेश तलवारे,कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे ,विजयकुमार कोळी ,भागवत डोईफोडे  यांचे विशेष सहकार्य  लाभले आहे. अशी माहिती एकदंत फिल्मचे लाईन प्रोड्युसर अमित कुलकर्णी आणि परेश फिल्म्सचे परेश ओझा यांनी दिली आहे.

या चित्रीकरणामध्ये सुमित कुलकर्णी ,चेतन कुलकर्णी ,पल्लवी कदम ,अविनाश वाघ ,आशिष गायकवाड ,विकास गवते हे सहभागी आहेत.

Samriddhi Highway news/The thrill of Mahendra XUV700 and Mahendra THAR filmed on the Samriddhi Highway

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!