मुंबई – काल मध्यरात्री ईडी कडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांना ईडी च्या विशेष कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने खा.संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने आठ दिवसांसाठी संजय राऊत यांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर केली होती. मात्र त्यांना ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे. न्यायमुर्ती एम जी देशपांडे यांनी सुनावणी घेतली होती.
कोठडी असतांना संजय राऊत यांना सकाळी ८:३० ते ९:३० पर्यंत आपल्या वकीलांशी चर्चा करता येईल त्यानंतर ईडी तर्फे दिवसभर त्याची चौकशी केली जाईल. मात्र रात्री १०:३० नंतर त्याची चौकशी होणार नाही असे ईडी तर्फे सांगण्यात आले. कोठडीत असतांना त्यांना घरचा डबा आणि औषधे देता येतील असे न्यायालयातर्फे सांगण्यात आले.
Shiv Sena leader Sanjay Raut sent to ED custody till August 4
Read @ANI Story | https://t.co/6FXe7TVKOr#Shivsena #SanjayRaut #EDCustody #SanjayrautEdcustody pic.twitter.com/57fUaFIOfv
— ANI Digital (@ani_digital) August 1, 2022