मुंबई,दि,१४ मे २०२४ – शिंदे-फडणवीस सरकारने नाशिकमध्ये ८०० कोटीचा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खा.राऊत यांनी पत्र लिहिले असून हे पत्र त्यांनी ट्विटर वर पोस्ट केले आहे.याप्रकरणी राऊतांनी ‘या घोटाळ्यात मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी आहेत. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार,’असा सवाल करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
संजय राऊत यांनी १३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक महापालिके झालेल्या ८०० कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पत्र पाठवले. तसेच हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवलेनशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचा आहे.जनतेच्या पैशांची ही सरळलूट आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्रर्ज त्यांच्यावर काय कारवाई करणार? लुटलेल्या एक एक पैस्याचा हिशोब द्यावाच लागेल असे ट्वीट करत संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी पत्रात काय लिहिले ?
“विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाच सातशे कोटी रुपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला.यामुळेच मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी टाळून संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत आहेत.”
नशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचाआहे.जनतेच्या पैशांची ही सरळलूटआहे.मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्रजी त्यांच्यावर काय कारवाई करणार?
लुटलेल्या एक एक पैस्याचा हिशोब द्यावाच लागेल!
@Dev_Fadnavis
@PMOIndia pic.twitter.com/pKltg2q5ak— Sanjay Raut (@rautsanjay61) May 14, 2024