नाशिकमध्ये पैशांचा पाऊस,संजय राऊत यांचा आरोप:पोस्ट केला VIDEO

मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!

0

नाशिक,दि,१३ मे २०२४ –शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटले जात असल्याचं संजय राऊतांनी आपल्या X अकाउंट वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दोन तासांसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते, मग पोलीस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.मुख्यमंत्री शिंदे जेव्हा नाशिक येथे हेलिकॉप्टरने पोहचले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तसेच पोलिसांच्या हातात मोठमोठ्या बॅग होत्या. यावरून संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दोन तासांसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते,मग पोलीस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.या बॅगांमधून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे द्वीटर) संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याचा व्हिडीओ द्वीट केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?
मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण ! नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. रविवारी रात्री १० वाजता मनोहर गार्डन हॉटेलमध्ये शिंदेंनी युतीतील नाराज असलेल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हॉटेलच्या रूममध्ये वन टू वन चर्चा करून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. यावेळी उदय सामंत देखील त्यांच्यासोबत होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!