मुंबई – कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा काल पार पडला हा कार्यक्रम सुरु झाल्या पासूनच यातील स्पर्धकांनीनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची नव्हे तर जगातील मराठी रसिकांची मने जिंकली आणि त्यांच्या निखळ,सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले.अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे सूर नवा ध्यास नवाची महागायिका होण्याचा मान पटकावला.
कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये,मानाची सुवर्णकटयार तर द्वितीय क्रमांक कोल्हापूरची संपदा माने पटकावला तिला कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह मिळाले.तृतीय क्रमांक बारामतीची राधा खुडे पटकावला तिला पंचाहत्तर रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.