भुजबळ फार्मवर भाजयुमोचे सरस्वती पुजन…

नाशिकमध्ये भुजबळांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध 

0

नाशिक,२८ सप्टेंबर २०२२ – राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नवरात्रीच्या सुरुवातीला जाहीर कार्यक्रमात सरस्वती व शारदा मातेचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचा  निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्यावतीने भुजबळ फार्म येथे छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांना सरस्वती मातेची प्रतिमा भेट देण्यासाठी पदाधिकारी गेले होते. भुजबळ उपस्थित नसल्यामुळे फार्म हाऊसवर सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज हे महापुरुष महाराष्ट्राचे दैवतच आहे त्यांचे रोज स्मरण झालेच पाहिजे त्याच बरोबर विद्येची देवता सरस्वती व शारदा माता यांची पण आराधना झाली पाहिजे. अशी भुमिका घेत भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांनी नमुद केली.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे, चंद्रशेखर पंचाक्षरी, विजय बनछोडे, राहुल कुलकर्णी, ऋषिकेश आहेर,धनंजय पुजारी, डॉ.वैभव महाले, संदिप शिरोळे, साक्षी दिंडोरकर, प्रविण भाटे, प्रशांत वाघ, विनोद येवले, भाविक तोरवणे, विकी पाटील, मुफद्दल पेंटर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!