(हरिअनंत,नाशिक) शनीच्या साडेसातीमुळे अतिशय गर्विष्ठ व्यक्तीचे शनी गर्वहरण करून त्याला योग्य धडा शिकवतो.लौकिक प्रतिष्ठेला धक्का बसतो. भाऊबंदकीत वाद निर्माण होतो.गृहकलह, कोर्ट- कचेरीची नको ते वाद उद्भवतात.अनपेक्षित प्रसंगाने व्यक्ती भांभाऊन जातात.साडेसाती भोगणाऱ्या विक्रमराजा सारखी स्थिती निर्माण होते.
शनीला सदाचारी व्यक्ती जर वाईट वागलेला दिसला, तर शनी अतिशय चिडतो. परंतु जन्मराशीपासून 3,6,10,व 11 या स्थानात शनी जर गोचरीने आला तर त्या शनीमुळे उद्योगधंद्यात भरभराट, नोकरीत बढती, भरपूर पैसा व आधिकारयोग आणि ऐश्वर्यप्राप्ती होते. शनीची ज्याच्यावर कृपा होते त्याची अतिशय वेगाने प्रगति होते,संपत्ती,अचानक धन लाभ होतो.जन्मराशीपासून 2,5,9 या राशीचा शनी अतिशय फलदायकआहे.
शनी हा विशेषकरून चंद्र व सूर्य याना जास्त पीडा देतो. आणि त्यातल्या- त्यात चंद्राला सर्वाधिक पीडा देतो. चंद्राच्या साडेसातीचा परिणाम स्वतःचे शरीर व परिवार यावर घडतो, तर रवीच्या साडेसातीचा परिणाम वडील, धंदा व राजकीय बाबी यावर घडतो. जन्मकाळी जर एका राशीवर चंद्र पुढे शनी व त्यापुढे रवी असेल, तर ही जन्मकालिची साडेसाती खूपच वाईट असते.
मेष, वृश्चिक, कर्क व सिंह आणि धनु या राशीवर जर रवि आन8 चंद्र एकत्र असतील तर साडेसातीचा परिणाम विशेषत्वाने जाणवतो. रवि आणि मंगळ यांच्याबरोबरचा शनियोग ही अतिशय कष्टदायक असतो. संकटावर संकटे, विविध अडचणी निर्माण होतात; जीवघेण्या आपत्ती आणि प्रचंड दुःख हे या योगाचे परिणाम अटळ असतात.
मीन राशीला लागणाऱ्या साडेसाती सोबत इतर राशीची चर्चा यासाठी आपण करीत आहोत याचे कारण म्हणजे शनीची अतिशय कणखर भूमिका आपल्याला कळावी. कारण शनी हा न्यायचा, कर्माचा स्वामी आहे. शनी विषयी आपण कधीच गैरसमज करून निष्कारण शनीला आरोपित करू नये तसेच उगाच शनीची भीती मनात बाळगू नये.
मीन राशीला साडेसाती आरंभ होणार असली तरी मीन राशींच्या व्यक्तींनी उगाच घाबरू नये, आपले कर्म उत्तम असेल तर मीन राशींच्या व्यक्तींना शनी उत्तम फायदा, आनंद आणि प्रगतीचे उत्तम बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. साडेसातीत त्रासाचं होतो,शनि खूप दुःख देतो हा गैरसमज करून घेऊ नये. मीन राशींच्या व्यक्तींनी आपल्या माता-पिता, गुरुचे वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नये.स्त्रीचे चुकूनही मन दुखवू नये आणि सर्वात महत्वाचे सखोल विचार केल्याशिवाय नको ते आर्थिक साहस करू नये व या चार महिन्यात चुकूनही व्याजाने भली मोठी रक्कम घेऊ नये व देऊ नये कारण … (क्रमशः) भाग – १६०
साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत
