नाशिक – नाशिकच्या सार्वजानिक वाचनालयाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२-२०२७ येत्या ८ मे रोजी होणार असून आज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकूण ३३ उमेदवारांनी माघार घेतली.सावानाच्या निवडूणुकीत आता २ पॅनल होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. १२ उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. सावानाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १ अध्यक्ष २ उपाध्यक्ष आणि १५ कार्यकारिणी सदस्य असे उमेदवार असणार आहेत.आज काहीवेळा पूर्वी श्रीकांत बेणी व वसंत खैरनार यांच्या ‘ग्रंथमित्र’ पॅनलची घोषणा करण्यात आली आहे.तर ग्रंथालय भूषण पॅनलची घोषणा उद्या सकाळ पर्यंत होण्याची शक्यता आहे.
आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष पदासाठी एकूण ४ उमेदवारी अर्जा पैकी विलास पोतदार व मकरंद सुखात्मे यांनी माघार घेतल्या मुळे आता प्रा.दिलीप फडके आणि वसंत खैरनार यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी ५ अर्ज आले होते त्यापैकी १ उमेदवारांनी माघार घेतली.तर १८ कार्यकारिणी सदस्यांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.या वर्षी ‘जनस्थान पॅनल’ने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे १२ अपक्षांसह श्रीकांत बेणी व वसंत खैरनार यांच्या ‘ग्रंथमित्र’ तर प्रा.दिलीप फडके व जयप्रकाश जातेगांवकर यांच्या ‘ग्रंथालय भूषण’ या पॅनल मध्ये लढत होणार आहे.
आज घोषित झालेले ग्रंथ मित्र पॅनलचे उमेदवार खालील प्रमाणे
अध्यक्ष – खैरनार वसंतराव दगुजी
उपाध्यक्ष – देशमुख मानसी किरण
उपाध्यक्ष – धोंडगे दिलीप माधवराव
कार्यकारी मंडळ सदस्य
कुशारे रमेश बाळनाथ
जुन्नरे प्रशांत जनार्दन
देशपांडे अनिल मोहिनीराज
देवरे हेमंत नथुजी
नागरे मंगेश शंकरराव
नेवासकर अरुण वसंतराव
पाटील अशोक यादव
पोतदार विलास पुंडलिक
बाफना संगिता राजेंद्र
बेनी श्रीकांत गजानन
बोऱ्हाडे शंकर किसन
राजे शिरीष वामन
शौचे भानुदास गजानन
वाळुंजे अविनाश हेमराज
सूर्यवंशी तुषार अभिमन्यू