Seema Deo: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

0

मुंबई,दि. २४ ऑगस्ट २०२३ –मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले आहे.वयाच्या ८१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी  त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते.इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे,या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं.सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते.त्यांचे २फेब्रुवारी २०२२ रोजी निधन होते.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या जवळपास वर्षभर त्या वयोमानानुसार आजारी होत्या.शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. गेल्या काही काळापासून सीम त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या.अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत.सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.