पुणे,२९ मार्च २०२३- भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजाराने आज निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते.गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
त्यांचा पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी गिरीश बापट एक होते. यांना आज सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं
टेल्को कंपनीत १९७३ ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे महिन्याभरापूर्वी पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सुरुवातीला प्रकृतीमुळे प्रचारात सक्रिय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र पक्षनिष्ठा जपत ते पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते. त्यांनी आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला होता.