ज्येष्ठ गणितज्ञ डॉ.मंगला जयंत नारळीकर यांचे निधन

0

पुणे,दि.१७ जुलै २०२३ –ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि जेष्ठ गणितज्ञ डॉ. मंगलाताई नारळीकर यांचे आज पुण्यात राहत्या घरी निधन झाले.त्या ७९ वर्षांच्या होत्या गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाचा सामना करत होत्या आज त्यांचे निधन झाले.ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या.संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू,तर बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. डॉ. मंगला नारळीकर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यातआले. त्या पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आयूका येथे ठेवण्यात आले.

डॉ.मंगला नारळीकर यांना कॅन्सरमुळे आजारी होत्या.त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या.मात्र,हा आजार पुन्हा उफळल्याने त्या काही दिवसांपासून आजारी होत्या.दरम्यान,आज त्यांची प्राणज्योत मालवली. पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी झाला. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर १९६४ साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. त्यांनी विद्यापीठातून पहिल्या येण्याचा बहुमान मिळवला. १९६४ ते १९६६ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात सहायक संशोधक व त्या नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले. तर १९६७ ते १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात देखील गणिताचे अध्यापन केले.

१९६५ मध्ये मंगला राजवाडे यांचा विवाह गणिती आणि अंतराळ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. डॉ. मंगला त्यांनी प्रगत गणितावर काम असून लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्या निपुण होत्या. डॉ. मंगला यांनी इंग्रजी व मराठी भाषेत विविध विषयांवर पुस्तके लिहिलेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे आदी पुस्तके गाजली आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.