वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : नाशिक कडुन परभणीचा धुव्वा

१ डाव व २४४ धावांनी मोठा विजय : यासर शेख नाबाद २००, कुणाल कोठावदे १२७, मुर्तुझा ची अष्टपैलु चमक

0

नाशिक – औरंगाबाद येथे खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए  सिनियर इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिक ने परभणी संघाविरुद्ध १ डाव व २४४ धावांनी दणदणीत विजय मिळविला. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या परभणी ला , नाशिकच्या गोलंदाजांनी २५ व्या षटकात केवळ ५९ धावात गुंडाळले. मुर्तुझा ट्रंकवाला ने ५ बळी घेत गोलंदाजीत चमक दाखविली.

उत्तरादाखल नाशिक च्या सलामीवीर यासर शेख च्या जोरदार नाबाद २०० ( ५ षटकार व २७ चौकार ) , कुणाल कोठावदे १२७ ( ७ षटकार व १३ चौकार ) तसेच मुर्तुझा ट्रंकवाला फटकेबाज ४९ ( ४ षटकार व ५ चौकार ) व धनंजय ठाकुर नाबाद ३२ , या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर , षटकामागे ७.६१  च्या सरासरीने केवळ ५७ षटके खेळुन ३ बाद ४३४ ह्या प्रचंड धावसंख्ये वर पहिला डाव घोषित केला .
नंतर नाशिकच्या गोलंदाजांनी परभणी चा दुसरा डाव ३२ व्या षटकात १३१ धावांत संपवून, दुसर्‍या दिवशी उपहारापूर्वीच १ डाव व २४४ धावांनी दणदणीत  विजय मिळविला  तन्मय शिरोडे ने दोन्ही डावात ३/३ बळी घेतले. या विजया बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघ व प्रशिक्षकांचे चे अभिनंदन केले आहे.

संक्षिप्त धावफलक व निकाल : परभणी – नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी – पहिला डाव – सर्वबाद ५९ ( २४.१ षटके ) – मुर्तुझा ट्रंकवाला ५ , तन्मय शिरोडे ३ तर प्रतीक तिवारी २ बळी.नाशिक – पहिला डाव – ३ बाद ४३४ डाव घोषित ( ५७ षटके ) – यासर शेख नाबाद २०० , कुणाल कोठावदे १२७, मुर्तुझा ट्रंकवाला ४९, धनंजय ठाकुर नाबाद ३२.परभणी – दुसरा डाव – सर्वबाद ( ३१.३ षटके ) –  शुभम कटारे ४४, सौरभ शिंदे ३०. तन्मय शिरोडे व मुर्तुझा ट्रंकवाला प्रत्येकी ३ तर तेजस पवार  व  ऋतुराज ठाकरे प्रत्येकी २ बळी.नाशिक १ डाव व २४४ धावांनी विजयी .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.