‘शब्दआभा’ ,शब्द ते चित्र प्रवास : रोटरी क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटी तर्फे कार्यशाळेचे आयोजन

सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव,ज्येष्ठ कवी अशोक बागवे,प्रसिद्ध संगीतकार मिलींद जोशी,अभिनेता- दिग्दर्शक प्रबोध कुलकर्णी यांचे मिळणार मार्गदर्शन

0

नाशिक – रोटरी क्लब ॲाफ नाशिक स्मार्ट सिटी आणि प्रबोध कुलकर्णी , ह्यांच्या संयुक्त विद्दमाने, नाशिक मधे एक आगळ्या वेगळ्या ५दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३ ते ७ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात येत आहे रोटरी ही सामाजीक आंतरराष्ट्रीय सामाजीक संस्था आहे.त्यामुळे ह्या कार्यशाळेमधून मिळणारा पैसा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहे.तुमच्या सर्वांच्या सहकार्याने,सहभागाने आणि श्री.बागवे सरांच्या हस्ते कार्यशाळेच्या प्रथम दिवशी सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन करण्याचा मानस आहे. माहिती रोटे.अपर्णा मारावार यांनी दिली आहे.

‘ शब्दआभा ‘ शब्द ते चित्र प्रवास ह्या कार्यशाळेत १६ वर्षा पासून पुढे असे शिबीरार्थी भाग घेऊ शकणार आहेत.ह्या शिबिरात, नाटकं , मालिका , चित्रपट ह्या क्षेत्रातील ३५ / ४० वर्षे अनुभवी , श्री. प्रबोध कुलकर्णी व इतर मान्यवरांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तसेच लेखन , काव्य – कविता / रचना गीत , अभिनय , दिग्दर्शन , गाणं – संगीत , कॅमेरा टेकनिक , ह्याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन या पाच दिवसाच्या मार्गदर्शन शिबिरात मिळणार आहे.

हे शिबिर असल्याने , शिबीरार्थीं कडूनच काही तयारी / प्रॅक्टिकल्स करून घेण्यात येतील..तेव्हा नाटक , मालिका , सिनेमा , जाहिरात ह्या क्षेत्रात काम करू इच्छुकांना एक सुवर्णसंधी , ह्या शिबिरातून मिळणार आहे. शिबीरार्थीं कडून लेखन, रचना तयार करून घेतील – महाराष्ट्राचे लाडके कवी , गीतकार लेखक , कादंबरीकार कवीवर्य श्री. अशोक बागवे सर.त्यातील निवडक रचना / कविता ह्याची चाल , ह्याचे गाणं कसे तयार होते.ह्याचे प्रशिक्षण देतील , प्रसिद्ध संगीतकार श्री. मिलींद जोशी सर. पुढे ह्या क्षेत्रातील ३४/४० वर्षे अनुभवी , अभिनेता / दिग्दर्शक , अध्यक्ष – बाल नाट्य परिषद , ठाणे जिल्हा ,श्री. प्रबोध कुलकर्णी , हे अभिनय , दिग्दर्शन शिकवणार .आणि त्यातील गीत तयार झाल्यावर ते छोट्या / मोठ्या पडद्यावर झळकते , त्याची माहिती, त्या पर्यंतची प्रोसेस शिकवणार – मालिका , सिनेमा , जाहिराती मधील नामवंत व्यक्ती कॅमेरामन / निर्माते श्री.संजय जाधव.
अश्या ह्या ‘ शब्द ते दृश्य ‘ माध्यमाचा प्रवास सुरू होत आहे….

कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या कुसुमाग्रज स्मारक येथे स्वगत हॅाल ला ३ ॲागष्ट ते ७ ॲागष्ट,सायंकाळी ६ ते ९ पर्यंत ही कार्यशाळा होणार आहे.फक्त मर्यादित जागा असल्यामुळे , प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.,ह्याची नोंद घ्यावी..अधिक माहितीसाठी रोटे.अपर्णा मारावार ९४२२२४९५८३ रोटे.मुग्धा नागपूरकर 94234 85602 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.