“शब्दझुला पुन्हा झुलणार”
कुसुमाग्रज स्मारकात बुधवार १७ ऑगस्टला नाशिककर अनुभवणार ताला-सुराचा सुरेल संगम
नाशिक- काव्यरचनेला ताला-सुरात बांधून प्रभावी सादरीकरणाद्वारे रसिकांपुढे मांडणाऱ्या शब्द झुल्यातील गाणी या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी, सायंकाळी ६.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग १३ मे २०२२ रोजी सादर झाला होता त्यावेळ या अभिनव कार्यक्रमाला नाशिककर रसिकांचा उदंड प्रतिसाद दिला खास नाशिककर रसिकांच्या आग्रहास्तव या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा आयोजन करण्यात आले आहे. या अभिनव कार्यक्रमाची संकल्पना गायक-संगीतकार मिलिंद धटिंगण ह्यांची आहे.
शब्दझुल्यात नाशिक मधील नामवंत कवींच्या रचनांचा समावेश आहे.मिलिंद गांधी,संगीता ठाकूर चव्हाण,कविता शिंगणे गायधनी,नंद किशोर ठोंबरे, संजय कंक,स्वाती पाचपांडे,सुशीला संकलेचा, राजू देसले,कै.पुष्कर चोळकर ह्यांच्या रचना सादर होणारआहेत तसेच वाचक स्वर आणि गायन मिलिंद धटिंगण, राजश्री शिंपी, विवेक केळकर , सुवर्णा क्षीरसागर यांचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ स्मिता मालपुरे करणार असून डॉ सुमुखी अथणी आपल्या विलोभनीय पदन्यासातून या काव्यरचना विशद करणार आहेत.कार्यक्रमास पं मकरंद हिंगणे ह्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तांत्रिक साहाय्य अनुराग केंगे, संगीत संयोजन अनिल धुमाळ,ध्वनी सचिन तिडके, सजावट पूजा बेलोकर ह्यांची आहे.या कार्यक्रमाला डी. जे.हंसवानी यांचे विशेष योगदान लाभले आहे.
रसिकांसाठी मुक्त प्रवेश असून नाशिकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचाआनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.