शालिमार-हावडा एक्सप्रेसला नाशिकरोड रेल्वे स्थानकात आग 

0

नाशिक – नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या  शालिमार-हावडा एक्सप्रेसच्या एका बोगीला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.प्रवाशी गाडीला आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.या गाडीच्या पार्सल बोगीला ही आग लागली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्राप्त माहिती नुसार शालिमार-हावडा एक्सप्रेस नाशिकरोड स्थानकात पोहचताच हि आग लागल्याचे निदर्शनास आले. या गाडीच्या पार्सल डब्याला ही आग लागल्यानंतर तातडीने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. प्लॅटफॉम क्रमांक ३ वर हि घटना घडली असून मुंबई कडे जाणारी रेल्वे वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली असली तरी प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ सुरु राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.