शनिशास्त्र : मीन राशीच्या साडेसातीचा प्रथम चरण आरंभ होतोय ! काय काळजी घावी 

हरिअनंत,नाशिक

0

(हरिअनंत,नाशिक) शुक्राच्या दशेत शनीचे अंतर आपले स्वतःचे फल देत नाही.२९ एप्रिल २०२२ शुक्रवारी शनीचे राशी परिवर्तन होत आहे. शनी कुंभ राशीत प्रवेश करताच, धनु राशीची साडेसाती समाप्त होते आणि मीन राशीच्या साडेसातीचा प्रथम चरण आरंभ होतोय  १२ जुलै २०२२ मंगळवारी शनी वक्री होऊन पूर्वत मकर राशीत  प्रवेश करताच मीन राशीची साडेतीन महिन्याची साडेसाती समाप्त होते.

१६ जानेवारी २०२३ पर्यन्त मीन राशीची सुटका  होणार हे  निश्चित मात्र  मीन राशीच्या या साडेतीन महिन्याच्या साडेसातीत शनी मिन राशीची अतिशय सुक्ष्मरित्या चौकशी करणार अर्थात परीक्षा घेणार. यासाठी मिन राशींच्या व्यक्तींनी अतिशय सावध असणे अति महत्वाचे आहे.मीन राशींच्या व्यक्तींनी बेसावध राहून चालणार नाही. या साडेतीन महिन्यातील प्रत्येक क्षणी मीन राशीच्या व्यक्तींनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.

शनी विषयी ज्योतिष शास्त्राचे मत ज्याप्रकारे आहे त्याप्रमाणे शनी निश्चित पापग्रह नाही,कठोर देखील नाही. शनी शिस्तीचा कठोर आहे. शनी जाणीवपूर्वक कुणाला ही त्रास देत नाही आणि उगाच कुणाच्या मागे  लागून त्रास देत नाही.आपण केलेल्या कर्माचे चांगले वाईट फल शनी कुठल्याही प्रकारची हेरफेर न करता देत असतो.आपण तटस्थपणे   निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल शनीचा न्याय अतिशय रास्त आहे. शनी अतिशय कृपाळू, दयाळू आणि उदार आहे, स्त्रीवर अत्याचार केलेला, जाणीवपूर्वक स्त्रीला त्रास देणाऱ्या व्यक्तीला शनी शिक्षा केल्याशिवाय सोडीत नाही.

अन्यायी वृत्तीने वागून शनीची कितीही पूजाअर्चा  केली तरी अशा अन्यायी, कपटी व्यक्तींची पूजा शनी कधीच स्वीकारीत नाही.आई-वडील, मुक्या प्राण्यांची सेवा करणाऱ्या दयाळू व्यक्तीवर शनी विशेष कृपा करतो. शनी हा संपूर्ण  विश्वात होणाऱ्या कर्माचा न्यायाधिश आहे, शनीच्या नजरेतून कुठलेच कर्म लपून राहू शकत नाही. शनी गुरूचा विशेष आदर करतो  या कारणे गुरुचा अनादर करणाऱ्याला शनी  शिक्षा केल्याशिवाय सोडीत नाही आणि मीन  राशीचा स्वामी तर गुरू आहे यासाठी  या साडेतीन महिन्याच्या साडेसातीत मीन राशींच्या व्यक्तींनी … (क्रमशः)भाग -१५७

साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव  सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.