शरद पवारांचा मोठा निर्णय : राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्या विभाग आणि सेलची कार्यकारिणी बरखास्त 

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विभाग आणि सेल आता बरखास्त करण्यात येत आहेत अशा आशयाचे एक पत्रक पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाकडून काढण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे.

राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. तसा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे. निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोशल मीडियावर पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या सहीच पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बसखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे सगळे सेल देखील बरखास्त करण्यात आले आहेत. पक्षाच्या या पदांवर लवकरच नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. या बरखास्तीचे पत्र  पक्षाच्या सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पाठवण्यात आलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.