शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर – प्रफुल्ल पटेल

0

मुंबई.दि.५ मे २०२३ – मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीच्या बैठक पार पडली. यात शरद पवार यांचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचे नेतृत्व सुरू ठेवण्याची विनंती करणारा ठराव मंजूर केला. सुरुवातीपासूनच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत होते. मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता.

आज सकाळी पक्षाची बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार यांनी २ मे रोजी अचानक राजीनामा देण्याचे जाहीर केला. पुढील कृती आणि नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांची समिती नेमली. पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आज आमची समितीची बैठक झाली.त्यात शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे.

पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित करण्यासाठी शरद पवार यांनी १८ सदस्यीय समिती स्थापन केली त्यांनी हा निर्णय दिला आहेत. या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पीसी चाको, नरहरी झिरवाळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय गा मुंडे, जयदेव पाटील यांचा समावेश आहे. पक्षाच्या फ्रंटल सेलच्या प्रमुखांचा समावेश आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.