नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे “कला भूषण पुरस्कार”जाहीर !

सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते श्री शरद पोंक्षे यांच्या हस्ते पल्लवी पटवर्धन,अपर्णा क्षेमकल्याणी,किरण भालेराव,धनंजय वाबळे,सई मोराणकर ,डॉ .राजेश आहेर,यांचा होणार सन्मान

0

नाशिक,दि,२६ मार्च २०२५ – गेली २२ वर्ष सातत्याने हिंदू संस्कृती वाढवावी आणि टिकावी या उद्देशाने नववर्ष स्वागत बहुउद्देशीय संस्था आयोजित नववर्ष स्वागत यात्रा समिती गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा, शोभायात्रा व विविध स्पर्धांचे आयोजन करिता असते. यंदाच्या वर्षी नववर्ष स्वागत यात्रेबरोबरच कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नाशिकच्या भुमी पुत्र असलेल्या कलाकारांना “कला भूषण पुरस्कार” देऊन गौरवण्याची संकल्पना पुढे आली. आणि याच संकल्पनेला मूर्त रूप देत नाशिकच्या सहा गुणी कलाकारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

डॉ .राजेश आहेर, पल्लवी पटवर्धन, किरण भालेराव,अपर्णा क्षेमकल्याणी व सई आदिती तुषार या कलाकारांना कलाभुषण तर धनंजय वाबळे, यांना कलागुरु या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार हे नववर्ष स्वागत यात्रा बहुउददेशिय संस्था संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे “कला भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहेत. हे सर्व पुरस्कार सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक,अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सदर कार्यक्रम हा चैत्र प्रतिपदा शुद्ध पक्ष १९४७ अर्थात ३० मार्च २०२५ रोजी पेठे इस्टेट पेठे नगर, इंदिरानगर नाशिक येथे सायंकाळी ५:३० ते १० वा पर्यंत चालणा-या जल्लोष नववर्षाचा कला क्रीडा खाद्य संस्कृतीचा या कार्यक्रमात संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष श्री विराज लोमटे, सचिव श्री शरद गिते, उपाध्यक्ष सौ अश्विनी कुलकर्णी, तसेच श्री राजेश राव, ज्ञानेश्वर चिखले , विठ्ठलराव कुलकर्णी, अनिरुद्ध जोशी, महेश देशपांडे, अरुण मुनशेट्टीवार, शुभम भडांगे, सोनाली कुलकर्णी, महादेव जवळकर, अतुल देशपांडे, डॉ.आदिती मोराणकर, सुनिल जोशी, सुरेश जोशी, नेहा देशपांडे, स्वप्ना नाजिरकर,अक्षता देशपांडे प्रसन्न हिंगमिरे, मंदार देशपांडे, कैवल्य कुलकर्णी आदींसह असंख्य कार्यकर्ते यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!